Vaccines For Children: 3 जानेवारीपासून 15 ते 18वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला होणार सुरुवात : ABP Majha
15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीये.3 जानेवारीपासून 15 ते 18वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनचं संकट वाढत असल्यामुळे10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोस देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर सहव्याधीग्रस्त असलेल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी दिलीये. त्याचबरोबर जगातली पहिली डीएनए लस देखील भारतात तयार होत असल्याचं मोदींनी सांगितलंय. तसंच नाकाद्वारेही लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहितीही मोदींनी दिली.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News