वैज्ञानिकांनी परवानगी दिल्यानंतर लसीकरण सुरू होईल, कंपन्यांची तयारी पूर्ण - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाव्हायरसवरील लसीबाबत सर्वपक्षीय नेत्यांना आज (4 डिसेंबर) माहिती दिली. "तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील काही आठवड्यात कोरोना लस तयार होईल. वैज्ञानिकांनी हिरवा कंदिल देताच भारतात लसीकरण सुरु होईल," असं मोदींनी या बैठकीत सांगितलं. ते म्हणाले की, "लसीचा साठा आणि रिअल टाईम इन्फर्मेशनसाठी खास सॉफ्टवेअर तयार केलं आहे." "कोरोनाचं लसीकरण अभियान व्यापक असेल. अशा अभियानांविरोधात अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे तुम्ही लसीबाबत जागरुकता निर्माण करा," असं आवाहन मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांना केली.
Tags :
Russia Corona Vaccine Medicine For Corona Vaccine On Corona Covaccine Corona Cure Bmc Covishield Bharat Biotech Corona Vaccine PM Modi