उर्मिला मातोंडकर हातावर शिवबंधन, उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेच्या कोट्यातून आमदारकी! स्पेशल रिपोर्ट
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्याबाबत होकार कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकतंच कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या संघर्षात उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला चांगलंच फैलावर घेतलं होतं.