ABP Majha Headlines : 08:00 AM : 03 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी आमदारांची डिनर डिप्लोमसी झाली. महायुतीत वाद होईल अशी वक्तव्ये टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. आगामी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही आदेश दिले गेले. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला उत्तर देण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. उद्या ते थोरले बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली. गृहसहायकाच्या फोनवर धमकीचा मेसेज आला. हिंदुत्ववाद संदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे आमदार जगताप चर्चेत आहेत. पंढरीच्या वारीत शहरी नक्षलवादी शिरल्याचा मनीषा कायंदेंनी आरोप केला. "संविधानाच्या नावाखाली फेक नरेटिव पसरविणारे हेच लोक नाहीत ना?" असा कायंदेंना संशय आहे. यावर आदित्य ठाकरेंनी प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न अशी टीका केली. दिशा सालियन मृत्यू अपघाती असल्याचं मुंबई पोलिसांनी स्टॅम्प केलं. सतीश सालियन यांनी याचिका फेटाळण्याची मागणी केली. आदित्य ठाकरेंना हस्तक्षेप याचिका करण्याचा अधिकार नाही, असा सालियन यांच्या वकिलांचा दावा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने दलित कुटुंबाला शिवीगाळ केली. ऑडिओ क्लिप समोर आणत राष्ट्रवादीचे नेते विजयसिंग बांगर यांनी आरोप केला. हिंगोलीमध्ये बोगस इंग्लिश शाळा असल्याचं उघड झालं. नोंदणीच नसल्यानं ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही शाळा विनापरवाना सुरू होती. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईला येलो अलर्ट आहे. उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. चंद्रभागेत भाविकांना सुरक्षित स्नान करता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला. अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली. "बम बम बोले, हर हर महादेव" च्या जयघोषात पहलगाम बालतालमधून भाविक रवाना झाले. यात्रा मार्गावर निमलष्करी दल तैनात आहे. मुंबईकरांचा वडापाव पाच रुपयांनी महागला. रेल्वे स्थानकावरील वडापाव तेरा रुपयांऐवजी अठरा रुपयांना मिळत आहे. प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताच्या पाच बाद तीनशे दहा धावा झाल्या. कर्णधार शुभमन गिलच्या एकशे चौदा आणि यशस्वी जैस्वालच्या सत्त्याऐंशी धावांच्या जोरावर भारताने तीन शतकी मजल मारली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola