US Presidential Election | अमेरिकेत 'ट्रम्प कार्ड' निवडणुकीचं पारडं फिरवणार? अमेरिकेतून 'माझा'चा रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Oct 2020 10:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प उपचारानंतर व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. ट्रम्प यांना पुन्हा उपचारांची गरज भासली तर त्यांच्यावर व्हाईट हाऊसमध्येच उपचार करण्यात येणार आहेत. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकांच्या तयारीत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व्यस्त असतानाच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना वॉल्टर रीड रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली होती. परंतु, त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं नव्हतं.