Car New Rule :आठ आसनी कारमध्ये सहा एअर बॅग्ज अनिवार्य, क्रेंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा
Continues below advertisement
तुमच्याकडे कार असेल.. विशेषतः 8 आसनी कार असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे... कारण आठ आसनी कारमध्ये 6 एअर बॅग्ज अनिवार्य करण्यात आल्यात..केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही अतिशय महत्वाची घोषणा केलीय.. सध्या भारतात अनेक कारमध्ये चालक आणि त्या बाजूच्या आसनासाठी एअर बॅग्जची सुविधा असते.. मात्र मागच्या आसनांवर बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी विशेष सोय नसते.. मात्र आता मागच्या आसनांसाठी देखील एअर बॅग्ज लावण्यात येणार असल्यामुळं प्रवाशांची सुरक्षितता वाढणार आहे.. दरम्यान एअरबॅग्सची संख्या वाढल्यामुळं कारची किंमत देखील वाढणार आहे..
Continues below advertisement