Union Budget 2022:आजच्या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, नोकरदार, महिला या सगळ्यांना काय मिळणार याची उत्सुकता
आजच्या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, नोकरदार, महिला या सगळ्यांना काय मिळणार याची उत्सुकता आहे. कर रचनेत बदल होणार का याकडे नोकरदारांचं लक्ष असेल. उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांत निवडणूक होत असल्यानं शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होऊ शकतील असा अंदाज आहे. निवडणुकीच्या तोंडावर महागाईला आळा घालण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण काय उपाययोजना करतात याकडे देशातील जनतेचं लक्ष लागलं आहे. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठीही काही घोषणा होण्याची अपेक्षा आहे.