CM Konkan Tour | तानाजी मालुसरेंची 350वी पुण्यतिथी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज समाधीस्थळाचं लोकार्पण
नरवीर तानाजी मालुसरे यांची आज 350वी पुण्यतिथी आहे. रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावात तानाजी मालुसरेंच्या समाधीस्थळाचं लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे. रायगड जिल्ह्यातलं उमरठ हे गाव नरवीर तानाजी मालूसरेंची कर्मभूमी आहे.