Uday Samant | उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी | ABP Majha
राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हे मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे समोर आलंय. सामंत यांनी अभियांत्रिकी शाखेचे पदविकाधारक अर्थात डिप्लोमाधारक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. भाजप सरकारमध्ये मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठातील पदवीमुळे माजी उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजप विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झाले होते. आता हाच विरोध सामंतांनाही होण्याची शक्यता आहे.