Gadchiroli Naxal Attack | भामरागडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिस शहीद, चार जण गंभीर जखमी

पंढरपूर : एकीकडे पोलीस बांधव कोरोना संकटाविरोधात लढत असताना दुसरीकडे नक्षली कारवायांना उत आला आहे. आज (17 मे 2020) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भामरागड तालुक्यातील पोरयकोटी-कोरपर्शी जगंलात नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. यात क्युआरटी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने आणि एक सी-60 पथकाचा जवान शहीद झाला आहे. या घटनेत तीन जवान जखमी झाले आहेत. धनाजी होनमाने हे पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावचे सुपुत्र आहेत. याची माहिती समजताच पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola