मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, लग्नाला जाणाऱ्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू, सहा गंभीर जखमी
Continues below advertisement
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी गावाजवळील सूसरी नदीच्या पुलावर मुंबई माहीम हून गुजरात वापी या ठिकाणी शेख कुटुंब आज लग्नाला जात असताना इको कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात घडला, दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला असून. अपघात इतका भीषण होता की, इको गाडी चा पूर्ण चक्काचूर झाला असून गाडीतील दोन जण जागीच ठार झाले, त्यातील एका 1 वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे. मुंबई (माहीम ) हून आज शेख कुटुंब नातेवाईकांच्या वापी येथे लग्नाला जात होते, मात्र सुखाच्या वेळी शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Continues below advertisement