#MarathaReservation उद्या मुंबई ते ठाणे मराठा जोडो अभियान, आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2020 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्या मराठा क्रांती मोर्चा महामुंबई यांच्यावतीने 'मराठा जोडो अभियान' राबवण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात सकाळी 10 वाजता लालबाग येथून होईल आणि त्यानंतर हा संघर्ष मोर्चा सायन, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर मार्गे ठाण्याला संध्याकाळी पोहचेल. मोर्च्याला परवानगी नाही तरीदेखील त्यांनी मोर्चा काढला तर मोठा राडा होण्याची शक्यता आहे. मोर्चा निघाला तर सर्व विभागातील लोकं त्यात सहभागी होत होत पुढं जातील. यादरम्यान कायदा सुव्यवस्थाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.