Farmer Protest: शेतकरी आंदोलनाबाबत आज अखेर मोठी घोषणा ABP MAJHA
दिल्लीतल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाबाबत आज अखेर मोठी घोषणा झालीय. पंतप्रधानांनी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही आंदोलनावर ठाम असलेले शेतकरी अखेर दिल्लीच्या सीमांवरुन घरी जायला तयार झालेत. सरकारनं त्यांच्या काही मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं अखेर हा निर्णय घेतला गेलाय.