#Suicide Tik Tok स्टार समीर गायकवाडची पुण्यात आत्महत्या, राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं

पुणे : टिकटॉक स्टार अभिनेता समीर गायकवाड याने घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीतील त्याच्या घरात त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola