Children stuck in Lift | कल्याणमधील इमारतीत तांत्रिक बिघाडामुळे लिफ्टमध्ये तीन लहान मुलं अडकली
तीन लहान मुलं इमारतीच्या लिफ्टमध्ये तब्बल दोन तास अडकून पडल्याची घटना कल्याणमध्ये समोर आली. कल्याण पश्चिमेच्या गांधी चौकात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या भागात खेडा अव्हेन्यू नावाची इमारत असून त्यात तीन लहान मुलं कोणीही मोठी व्यक्ती सोबत नसताना लिफ्टने जात होती. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे ही लिफ्ट अडकली आणि तिचा दरवाजाही बंद झाला. ही बाब लक्षात येताच फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आलं.