सांगलीत शेअर मार्केटमधील मुलाची गुंतवणूक जीवावर बेतली, कर्जामुळे सांगलीत कुटुंबाची आत्महत्या
Continues below advertisement
सांगली : कर्जाला कंटाळून मिरजेच्या बेळंकी येथे एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी व एका मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी मुलाने सावकारांकडून कर्ज घेतले आणि शेअर मार्केटमधून अपेक्षित पैसे न मिळाल्याने हे गवाणे कुटूंब संकटाच्या खाईत अडकले. मग ज्या सावकरांकडून पैसे घेतले होते त्याचा तगादा सुरू झाला आणि हा त्रास सहन न झाल्याने वडील, आई आणि त्या मुलाने मृत्यूलाच कवटाळले. सेवानिवृत्त पोलीस अण्णासो गुरसिद गव्हाणे, पत्नी मालन अण्णासो गव्हाणे आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी या आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
Continues below advertisement