Pimpri Corona Deaths | कोरोनानं घेतला तीन वयोवृद्ध भावंडांचा बळी, एकाच कुटुंबात 18 जणांना लागण,कोरोनामुळं दु:खाचा डोंगर
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली. कोरोना हद्दपार होईल तेव्हा यातील बहुतांश कुटुंब उभारी घेतील ही, पण या कोरोनामुळे पिंपरी चिंचवडमधील एका कुटुंबाची अवघ्या आठ दिवसात झालेली अवस्था पाहून, तुमचं ही हृदय पिळवटून जाईल. या एकाच कुटुंबातील 18 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आणि तब्बल आठ दिवसातच तीन सख्ख्या वयोवृद्ध भावांचा या कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. लाडका लहानगा भाऊ सोडून गेल्याने मोठे दोन्ही भाऊ खचून गेले. यातूनच रक्तदाबाचा त्रास होत असलेल्या 66 वर्षीय बंधूची प्रकृती चिंताजनक झाली आणि 12 जुलैला त्यांनी ही अखेरचा श्वास घेतला.