#Coronavirus | कल्याण-डोंबिवलीत पोलीस कर्मचारी आणि शासकीय रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण
कल्याण-डोंबिवलीत महापालिका हद्दीत कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले आहेत यामध्ये 61 वर्षीय कोरोनाबाधिताच्या सहवासातील रुग्ण, पोलीस कर्मचारी, शासकीय रुग्णालयातील नर्स यांचा समावेश आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याने विशेष सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.