तीन एकरावरील उडदाचं पीक भिजून खराब,बाजारपेठेत जाण्यासाठीचा तयार माल वाया,शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
Continues below advertisement
धाड़ परिसरात प्रचंड मुसळधार पाऊस झालाय, या पावसाने बाणगंगा, धामणा, नदया दुथडी भरून वाहिल्या. या नदीच्या पुराचे पाणी नदीकाठच्या शेतात घुसले व उडिद, मूग, सोयाबीन, पिके वाहून गेलीत तर काही शेतातील पिके अक्षरशः झोपली. शेती खरडल्या गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास या नैसर्गिक आपत्तिने हिरावून घेतला असल्याचे चित्र स्प्ष्ट झाले आहे. वरुड, जामठी, मासरूळ व धाड़ या गावातील 1500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच प्रशासनाच्या वतीने अद्याप शेतातील पिकांच्या नुकसानाचे सर्व्हे करण्यात आला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
Continues below advertisement
Tags :
Farmers Of Maharashtra Farmer In Maharashtra Agriculture News Farmer Loss Farmers Buldhana Special Report Maharashtra Farmers