Raj Thackeray Mahavikas Aghadi | जिथे एकोपा नाही, एकमत नाही ते सरकार फार काळ टिकू शकत नाही-राज ठाकरे
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही," असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. कोरोना संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभाराचं, कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. तसंच हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. जिथे एकोपा नाही, एकमत नाही ते जास्त काळ टिकेल, असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.
Tags :
Raj On Uddhav Raj Thackeray Interview Majha Maharashtra Majha Vision Uddhav Thackeray Raj Thackeray