INDIA - CHINA | सीमाभागात ना घुसखोरी झाली, ना कोणती पोस्ट दुसऱ्याच्या ताब्यात - पंतप्रधान मोदी
Continues below advertisement
नवी दिल्ली : आपल्या सीमाभागात कोणीही घुसले नसून आपली कोणतीही पोस्ट शत्रूच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले 20 वीर जवान शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारत मातेकडे डोळे करुन पाहिलं त्यांना धडा शिकवून ते गेले. डेप्लॉयमेंट, कारवाई आणि प्रत्युत्तर देण्यासह देशाच्या संरक्षणासाठी जे करायला हवं ते आपलं सैन्य करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत-चीन सीमेवरील हिंसक झटापटीनंतर एलएसीवर तणाव आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात ते बोलत होते.
Continues below advertisement
Tags :
China Attack India Vs China Indian Soldier India China War India China India China Border PM Modi