BEST Privatization | 'बेस्ट'चं खाजगीकरण नाही, महापौर किशोरी पेडणेकर यांचं स्पष्टीकरण

Continues below advertisement

मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाची खाजगीकरणाकडे वाटचाल सुरु असल्याचं दिसतंय. भाडेतत्त्वावर बस आणि ड्रायव्हर घेतल्यानंतर आता कंडक्टरही  खाजगी कंत्राटदारांकडून नेमण्याचा बेस्टचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत 1100 बसेस भाडेतत्त्वावरील आहेत. या बसेसवर आधी चालक कंत्राटदाराचा असेल असा पवित्रा बेस्ट उपक्रमाने घेतला होता. परंतु आता वाहकही खाजगी कंत्राटदाराचा असेल अशी भूमिका बेस्ट उपक्रमानं घेतली आहे. बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाला भाजपसह काँग्रेसने विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाडेतत्त्वावरील बसेस पाठोपाठ आता कंत्राटदारांचे चालक व वाहक म्हणजे बेस्ट उपक्रमाची खाजगीकरणाकडे वाटचाल सुरु असल्याचा आरोप भाजप व काँग्रेसने केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram