Ajit Pawar | राष्ट्रवादीचे गटनेते हे अजित पवारच आहेत- दानवे | ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदेश धुडकावून आमदार अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या गोटात सहभागी झाले. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपने राज्यात सत्तास्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवारांवर कारवाई करत त्यांची गटनेते पदावरुन हकालपट्टी केली असल्याचे जाहीर केले होते. परंतु राष्ट्रवादीने अजित पवारांनी विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी केलेली नसून अजित पवार अद्याप राष्ट्रवादीच्या आमदारांचे गटनेते आहेत, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती.