#MumbaiMetro मेट्रो रुळावर धावण्यासाठी 2023 साल उजाडेल, MMRDA आयुक्त आर ए राजीव यांचं मत
आरे येथील कारशेड दुसरीकडे हलवण्याचा निर्णय ऐकल्या नंतर स्थानिक रहिवासी प्रकाश भोईर म्हणाले की, आरेतील जंगल वाचवा यासाठी मी आणि माझ्या कुटुंबाने सदैव प्रयत्न केले आहेत. याचंच उदाहरण द्याचं तर माझ्या पत्नीवर देखील आंदोलन करते वेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आम्ही तरीदेखील आमची मागणी वारंवार लावून धरली होती. अखेर आज कारशेड हलवण्यात आल्याचा निर्णय झाला त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना साखर भरवून आनंद साजरा केला. यातील आणखी एक बाब म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरे हे जंगल म्हणून घोषित केल आणि त्यात 200 एकरची वाढ करून ते 800 एकर केलं हे समस्त मुंबईकरांसाठी आनंदाची बाब आहे.