Tadoba Tiger Project | सहा महिन्यांनतर ताडोबा व्याघ्र प्रकल्प खुला, गर्भवती महिला, 10 वर्षांखालील मुलांना बंदी

Continues below advertisement
पुनश्च हरीओम म्हणत सरकारने अनेक गोष्टींवरील बंदी हळूहळू उठवली. राज्यातील काही  पर्यटनस्थळी आजपासून खुली झाली आहेत. यात चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन तसंच कोल्हापुरातील पन्हाळगड नियम आणि अटींसह पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. कोरोनाव्हायरसमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून सर्वच पर्यटन स्थळं बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता तब्बल सात महिन्यांनी पर्यटन स्थळं सुरु होत असल्याने व्यावसायिकांनीही आनंद व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram