लोककला दारोदारी पोहोचवणाऱ्या कलावंतांची लॉकडाऊनमध्ये अवस्था बिकट, मंगळसूत्र विकून दोन वेळचं जेवण...
Continues below advertisement
महाराष्ट्राची लोककला दारोदार पोहचविणारे हे आहेत बीडच्या लिंबागणेश गावचे काटे कुटुंबीय. काटे आणि जाधव या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कलेच्या माध्यमातून भुरळ घातलीय. आता त्यांचीच तिसरी पिढी देखील या लोककलेचा वारसा जपतेय. मात्र सहा महिन्यापूर्वी कोरोंनाचा शिरकाव झाला आणि या कलावंताचे कार्यक्रम बंद झाले. याच जागरण गोंधळ पार्टीत संबळ वादक म्हणून काम करणारे हे आहेत विलास काटे. कुटुंबात पाच सदस्य, अपंग बहीण तिच्या दवाखान्याचा खर्च ही सगळी जबाबदारी विलास यांच्यावरच आहे मात्र गेल्या सहा महिन्यापासून जागरण गोंधळ आणि धार्मिक कार्यक्रम बंद झाल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. कुटुंबाच्या उदर्निर्वाहासाठी त्यांना आपल्या पत्नीच मंगळसूत्र विकाव लागलंय.
Continues below advertisement