#Pulwama पुलवामा हल्ला पाकिस्तान सरकारने घडवला,पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरींची कबुली
Continues below advertisement
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने मोठा गौप्यस्फोट केला आहे. पुलवामा हल्ला पाकिस्ताननंच घडवल्याची कबुली पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरी यांची दिली आहे. भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि लष्करप्रमुख बाजवा यांना घाम फुटला होता आणि त्यांचे पाय थरथरत होते, असा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य अयाझ सादिक यांनी केला. त्यांना उत्तर देताना फवाद चौधरींनी पुलवामा हल्ला हे इमरान खान सरकारचं यश असल्याचं म्हटलं आहे.
Continues below advertisement