दसऱ्यापासून राज्यात जिम सुरू होण्याची शक्यता, कशा प्रकारे व्यायाम होणार? कोणत्या गोष्टींना बंदी?
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यभरातील जिम व्यवसायिक, फिटनेस सेंटर आणि व्यायामशाळा प्रतिनिधीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. यामध्ये गेल्या 7 महिन्यापासून बंद असलेल्या जिम, व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी व्यवसायिकांनी वारंवार केल्यानंतर दसऱ्यापासून जर सगळे मार्गदर्शक तत्वे काटेकोरपणे पाळले जाणार असतील तर राज्य सरकार जिम सुरू करण्यास परवानगी देईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम व्यवसायिकांना दिलं आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेल्या जिम सुरू करण्याची मागणी करणाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.
Continues below advertisement