पुण्यातील चैत्राली कुलकर्णीच्या हत्येचं गुढ चार वर्षांनंतरही कायम,सुशांत साठीची तत्परता इथं का नाही?
Continues below advertisement
पुणे : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा यासाठी मोठी मोहीम चालवण्यात आली. मात्र, चार वर्षांपूर्वी पुण्यातील आयुर्वेद डॉक्टर चैत्राली कुलकर्णी यांचा देखील असाच संशयास्पद मृत्यू झाला होता. परंतु, तिच्या मृत्यूची चौकशी होऊन तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या तिच्या वडिलांनी आणि आईने जंग जंग पछाडूनही त्यांना दाद मिळालेली नाही. आधी पोलिसांनी आणि त्यांनतर सीआयडीकडे तपास गेल्यानंतरही चैत्रालीच्या मृत्यूचं गूढ उकललेले नाही.
Continues below advertisement