Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या यात्रेचा मुहूर्त ठरला ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
12 Dec 2021 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या यात्रेचा मुहूर्त ठरलाय. यंदा २४ फेब्रुवारीला यात्रोत्सव संपन्न होणार आहे. राज्याच्या विविध भागातून भाविक देवीच्या दर्शनासाठी इथं हजेरी लावतात. तसंच राजकीय नेतेमंडळीही देवीचं दर्शन घेतात. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला यात्रोत्सव केवळ आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. यावर्षी देवीच्या सर्व भाविकांना आंगणेवाडीत उपस्थित राहून देवीचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती देण्यात आलीय.