INS VIRAT | देशाला सलग 30वर्ष सेवा देणाऱ्या आयएनएस 'विराट'चा मुंबईहून गुजरातच्या दिशेनं अंतिम प्रवास

Continues below advertisement
मुंबई : भारतीय नौदालामार्फत देशाला सलग 30 वर्ष सेवा देणाऱ्या आयएनएस 'विराट'नं शनिवारी मुंबई बंदरातून गुजरातमधील अलंग बंदराच्या दिशेनं आपला अंतिम प्रवास सुरू केला. रविवारी मध्यरात्रीपर्यंत विराट तिथं पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिथं विराटला मोडीत काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. साल 1987 ते 2017 अशी तीस वर्ष ही विश्वविक्रमी विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलातील सर्वात आघाडीची युद्धनौका म्हणून गणली गेली. सध्या हा मान आयएनएस विक्रमादित्यकडे आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram