Nandurbar : देशातील सर्वात मोठा घोडेबाजार , 600 घोडे विक्रीसाठी दाखल ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
15 Dec 2021 08:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअश्वपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमधील सारंगखेडा १८ तारखेपासून घोडेबाजार सुरु होतोय.मागील २ वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घोडेबाजार बंद होता. पण यावर्षी प्रशासन आणि चेतक फेस्टिव्हल समितीच्या वतीनं घोडेबाजाराची तयारी अंतिम टप्प्यात आलीए. ११ एकर जागेवर घोडेबाजार होणार आहे. त्य़ासाठी देशभरातून ६०० घोडे विक्रीसाठी दाखल झालेत. आणखी दीड ते दोन हजार घोडे इथे येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. प्रशासनाच्या अटींनुसार लसीकरण झालेल्या अश्वप्रेमींनाच या घोडेबाजारात प्रवेश दिला जाईल. तर, यावर्षी अश्व सौंदर्य स्पर्धा आणि अश्व दौड होणार आहे.. मात्र अश्व नृत्य आणि इतर स्पर्धा होणार नसल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.