स्वदेशी Covaxin चा पहिला टप्पा सुरक्षित आणि प्रभावी, लसीचे दुष्परिणाम नाहीत, कंपनीचं आश्वासन
नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक महामारीला एक वर्ष पूर्ण होत असतानाच आता देशात लसीकरणाच्या कार्यक्रमाचीही जोरात तयारी सुरु झाली आहे. अद्याप देशात कुठल्या कंपनीला हिरवा कंदील मिळालेला नसला तरी सरकारी यंत्रणा लसीच्या वेगानं पुरवठ्यासाठी सज्ज होतं आहे. कोरोनाच्या लसीकरणासाठी सरकारचा मेगा प्लॅन 23 मंत्रालयं एकत्रितपणे मोहीम राबवणार आहे. 29 हजार कोल्ड चेन पॉईंटस 70 हजार वॉक इन फ्रीजर्स ही तयारी आहे.