Satara | संपूर्ण सातारा जिल्हा 17 ते 22 जुलैदरम्यान लॉकडाऊन,कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आदेश
Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे सातारकर मोठ्या चिंतेत होते. लॉकडाऊन केला जावा अशी मोठ्या प्रमाणावर मागणी सातारकरांकडून पाहायला मिळत होती. मात्र पूर्ण दिवस बंद राहणारी दुकानंही अंशता उघडून ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कुठेच कमी होताना पाहायला मिळत नव्हता. उलट दिवसेंदिवस बाधितांची आकडेवारी वाढताना पाहायला मिळत होती. गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाचा वाढता आलेख ब्रेक करण्याच्या अनुषंगाने साताऱ्यातील विविध प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची काल बैठक बोलावली.विविध विषयांवर झालेल्या चर्चेनंतर आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा बंद करण्याचा निर्णय घेतला. येत्या 17 जुलैपासून ते 22 जुलै पर्यंत संपूर्ण सातारा जिल्हा लाॕकडाऊन करण्याचा अध्यादेश काढला.
Continues below advertisement