Nanded ST : नांदेडमध्ये एसटी वाहकाच्या मृत्यूवरुन वातावरण तापलं
नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूवरुन वातावरण तापलंय. निलंबनाच्या धक्क्याने एसटी वाहकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी केलाय. मृत एसटी वाहक दीपक वीर यांचा मृतदेह कुटुंबीयांनी नांदेड आगारात ठेवलाय. या ठिकाणी कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन सुरु केलंय. निलंबन करणाऱ्या आगार प्रमुखावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.