Pune : बस चालकाला फीट, महिलेच्या हाती स्टेअरिंग 22 महिलांचा वाचवला जीव : ABP Majha

Continues below advertisement

पुण्यातील शिरुर तालुक्यातील एक व्हीडिओ व्हायरल झालाय. २२ ते २३ महिलांचा ग्रुप शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली इथं फिरायला गेला होता. त्यावेळी या बसमधील चालकाला अचानक फीट आली आणि चालक खाली कोसळला. चालकाची ही अवस्था पाहून बसमधील सर्वच महिला घाबरल्या. बसमधे दुसरा पुरुष नसल्याने आता काय करायचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. मात्र त्याचवेळी बसमधील योगिता सातव यांनी प्रसंगावधान दाखवलं. योगिता यांनी तात्काळ पुढे येत स्वतः चालकाच्या सीटचा ताबा घेत बसचं स्टेअरिंग हाती घेतलं. ४० वर्षीय योगिता सातव यांना घरची फोर व्हीलर चालवण्याची सवय असली तरी बस चालवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती.  मात्र न डगमगता दहा किलोमीटर बस चालवून त्या आधी जवळच्या हॉस्पिटलला पोहोचल्या. चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आणि सर्व महिला प्रवाशांनाही योग्य स्थळी उतरवलं. अचानक उद्धभवलेल्या प्रसंगाचा धीराने सामना करत योगिता सातव यांनी परिस्थिती हाताळली. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होतंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram