Ulhasnagar Nanaware Family Case : आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठेंना अटक

दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्ट रोजी पत्नीसह आत्महत्या केली.  या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली होती. ननावरे यांच्या खिशातून मिळालेल्या चिठ्ठीतून काही लोकांची नावे समोर आली होती. पण त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने ननावरे यांचे सातारा जिल्ह्यातील फलटणमधील बंधू धनंजय ननावरे यांनी प्रत्येक आठवड्याला शरीराचा एक भाग भेट देण्याचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडिओतून दिला होता. त्याची दखल घेत काल लगेच कारवाईला सुरवात झाली आणि शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठेंना अटक करण्यात आलीय.. तसंच राष्ट्रवादीचे प्रवक्ते कमलेश निकम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांनाी अटक करण्यात आली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola