Uddhav Thackeray Mumbra Speech : निवडणुकीत मस्ती फाडू, डिपॉजिट जप्त करु, मुंब्रा येथे ठाकरेंचा एल्गार

Continues below advertisement

Uddhav Thackeray Mumbra Speech : निवडणुकीत मस्ती फाडू, डिपॉजिट जप्त करु, मुंब्रा येथे ठाकरेंचा एल्गार

ठाणे : खरा बुलडोजर काय असतो हे दाखवायला आलो होतो, पण पोलिसांनी त्यांच्या मालकाचे संरक्षण केलं. नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवा आणि समोर या, मग दाखवतो असं थेट आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे गटाला दिलं. 

पोलिसांनी आज या चोरांचं रक्षण केलं, पण या चोरांनी मशमाशीच्या पोळाला डिवचलं आहे, यांना फोडल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. येत्या निवडणुकीवेळी या चोरांचे डिपॉजिट जप्त करा असं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. 

यांना सत्तेचा माज आला असून बुलडोजर लावून त्यांनी शिवसेनेची शाखा पाडली, खरा बुलडोजर काय असतो हे यांना दाखवण्य़ासाठी आलो होतो. पण पोलिसांनी त्यांच्या मालकाचे संरक्षण केलं असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram