Uddhav Thackeray Car attack : उद्धव ठाकरेंच्या कारवर मनसैनिकांनी शेण फेकलं; EXCLUSIVE VIDEO

Uddhav Thackeray ,Thane :  ठाकरे गटाचे प्रमुख यांच्या गाडीवर मनसैनिकांकडून शेण फेकण्यात आलय. उद्धव ठाकरेंचा आज ठाण्यामध्ये 'भगवा सप्ताह मेळावा' पार पडणार आहे. त्यापूर्वी मनसैनिकांकडून उद्धव ठाकरेंच्या कारवर हल्ला करण्यात आलाय. काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर मनसेने आता थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकले आहे. उद्धव ठाकरेंचा ताफा जात असताना मनसैनिकांनी त्यांच्या गाडीवर शेण फेकले आहे.  शिवाय, ठाकरेंच्या ताफ्यावर  बांगड्या आणि टोमॅटो फेकण्यात आले आहेत. 

 मनसेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातल्या गाडीवर फुगे मारण्यात आले 

उद्धव ठाकरेंचा आज ठाण्यातील रंगतनमध्ये मेळावा पार पडणार आहे. त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले आहेत. सभास्थळी मनसैनिकांकडून गोंधळ घालण्यात येतोय. पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली आहे. मनसेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातल्या गाडीवर फुगे मारण्यात आले आहेत. ठाण्यातील गडकरी रंगा येथे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे. मनसेच्या वतीने बांगड्या टाकून उद्धव ठाकरे यांच्या निषेध करण्यात येतोय. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या वाहनाखाली टायर जवळ सुपारी ठेवण्यात आलेल्या आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola