Thane Tree Man | ठाण्यातले ट्री मॅन विजय कुमार कुट्टी! घरातल्या घरात 275 रोपटी, 40 विविध प्रकारच्या फळभाज्यांची लागवड!

ठाण्यातील बाळकुम येथे राहणारे निसर्गप्रेमी आणि पर्यावरण संरक्षणासाठी काम करणारे विजय कुमार कुट्टी यांनी आपल्या घरातच सुंदर बाग तयार केली आहे. त्यांच्या बेडरूममध्ये तब्बल 275 प्रकारची विविध झाडे त्यांनी लावली आहेत. तर त्यांच्या घराला असलेल्या बाल्कनीमध्ये एक किचन गार्डन तयार करून त्यात देखील 30 ते 40 फळभाज्या पालेभाज्या त्यांनी वाढवल्या आहेत. अठरा महिन्यांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा एक झाड आणले होते. मात्र काही कारणास्तव ते झाड जगू शकले नाही. त्यामुळे त्यांची जिज्ञासा वाढली आणि त्यांनी झाडांबद्दल माहिती गोळा करत ती माहिती प्रत्यक्षात अमलात आणून घरच्या घरीच अनेक झाडं लावली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola