Thane Wedding : ठाण्यात अनोखा विवाह सोहळा, शिंदेचा वर तर ठाकरे गटाची वधू
सध्याच्या राज्याच्या राजकारणात शिंदे आणि ठाकरे गटाचं वैर वाढलं आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत, मात्र एका विवाह सोहळ्याला दोन्ही गटातील नेते उपस्थित राहिल्याने या विवाहाची जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे ज्या ठाण्यातून या वैराला सुरुवात झाली, त्याच ठाण्यात हा विवाह सोहळा होता. शिंदे गटाचे आमदार रविंद्र फाटक यांचे स्वीय सहाय्यक अजिंक्य गावकर आणि ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा समन्वयक आरती खळे यांचा शुभ विवाह पार पडला. या निमित्ताने दोन्ही गटातील नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई, तसेच दोन्ही गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.