Thane Pandit Dhaygude : दुचाकी अंगावरुन नेणारा बाहुबली, गिनिज बुकमध्ये होणार विश्वविक्रमाची नोंद

ठाणेकरांसाठी आजचा रविवार विश्वविक्रमी ठरणार आहे. तब्बल 250 किलोपेक्षा जास्त वजनाच्या सुपरबाईक आपल्या पोटावरून जाऊ देण्याचा विश्वविक्रम ठाण्याच्या धर्मवीर मैदानात पाहायला मिळाला. ध्येयवेड्या माणसांना विक्रमाचं क्षितीज सारखं खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनत पणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच. मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त मुंबईत आलेले पंडित तुकाराम धायगुडे हे त्यापैकीच एक. त्यांनी त्यांच्या पोटावरून अंदाजे 270 किलो वजनाच्या दुचाकी जाऊ देण्याचा विश्वविक्रम दुस-यांदा केलाय.. हा विश्वविक्रम करण्यापूर्वी पंडित तुकाराम यांनी एका मिनिटांत 105 साईड सिट अप्स करत आज एक नवा विश्वविक्रमही आपल्या नावावर केलाय.. त्यानंतर त्यांनी जवळपास 376 मोटारसायकल आपल्या पोटावरुन नेण्याचा विक्रम केला.. त्यांच्या या विक्रमाचं कौतुक सध्या सर्वच स्तरातून होताना दिसतंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola