Thane Traffic : वाहतूक कोंडीच्या बातमीची उच्चस्तरीय दखल, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक Majha Impact
गेले काही दिवस ठाण्यातील वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण आहेत. आणि एबीपी माझानं ही व्यथा समोर आणताच प्रशासन खडबडून जागं झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझाच्या बातमीची दखल घेत आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आज महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आदी खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.