Thane Thackeray Group : ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण : ABP Majha
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आली.. घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात हा प्रकार घडला. रोशनी शिंदे असं या महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्या सहा महिन्यांच्या गर्भवती असल्याचं समजतंय.. रोशनी शिंदे संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत असताना, ऑफिसच्या आवारात शिरून त्यांना शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली, असा आरोप आहे. पोलिसांनी मात्र अजून एफआयआर दाखल केलेली नाही. तर वैद्यकीय अहवाल आल्यावर तपास सुरू करणार, असं पोलीस सांगतायत.