Mahesh Aher : महेश आहेर यांना मारहाण करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांना मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांना या कारणे दाखवा नोटिशीसह दोन वर्षांसाठी तडीपारीची नोटीसही बजावलीय. तडीपारीच्या या नोटिशीनुसार या चार कार्यकर्त्यांच्या ठाण्यासह मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमधल्या प्रवेशावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे.
Tags :
Raigad Palghar Beating Thane Municipal Corporation Show Cause Notice Navi Mumbai NCP MUMBAI Assistant Commissioner Mahesh Ahir Notice Of Revocation