Ram Ganesh Gadkari Rangayatan Thane : राम गणेश गडकरी रंगायतनचं लवकरच नूतनीकरण होणार

Continues below advertisement

ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राम गणेश गडकरी रंगायतनचं लवकरच नूतनीकरण केलं जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. सर्व बाबींचा अभ्यास करून ठाणे महापालिकेनं नूतनीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. तो शुक्रवारी मंजूर झाला. नाट्य कलावंत आणि प्रेक्षक यांची मतं जाणून घेऊनच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. १९७८ साली उभारलेल्या गडकरी रंगायतनमध्ये २००५ साली पहिल्यांदा नूतनीकरणाचं काम करण्यात आलं. त्यानंतर दरवर्षी किरकोळ कामं केली जात आहेत. मात्र आता एसी यंत्रणा, आसन व्यवस्था आणि कलावंतांसाठीच्या मेकअप रूम्सच्या नूतनीकरणाची सक्त गरज आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेनं राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. गडकरी रंगायतनची लोकप्रियतेचा विचार करता, नूतनीकरणाचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल, असंही ठाणे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram