Thane : ठाणे - कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांचं आंदोलन, प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल रोखली
कळवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे प्रवाशांनी आज एसी लोकल रोखून धरत आंदोलन केलं. एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला. मात्र, रेल्वे पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत आंदोलकांना हटवलं आणि लोकल वाहतूक पू्र्वववत केली.