Thane News : नराधम मोकाट, बेड्या कधी? तरुणीच्या अंगावर कार घालून मारण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

ठाण्यात प्रेयसीला कारखाली चिरडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेत पोलिस तपासाने वेग घेतलाय. या प्रकरणात कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेचा जबाबही नोंदवण्यात आलाय.आज प्रियावर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयात जाऊन  पोलिसांनी माहिती घेतली आणि तपास योग्य दिशेने सुरु असल्याची ग्वाही दिली. ज्या प्रियाच्या बाबतीत हा दुर्दैवी आणि चीड आणणारा प्रकार घडलाय ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ११ लाख फॉलोअर्स आहेत. ती जेव्हा आपल्या प्रियकराला त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल जाब विचारायला गेली तेव्हा तिचा प्रियकर अश्वजीत गायकवाडने ड्रायव्हरला सांगून तिच्या अंगावर कार नेत तिला मारण्याचा प्रयत्न केला. अश्वजीत हा एमएसआरडीसीचे सहसंचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा आहे. या घटनेत प्रिया जखमी झालीय आणि तिच्यावर उपचार सुरु आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram