Lok Sabha 2024 : ठाण्यातून Naresh Mhaske आणि कल्याणमधून डॉ. Shrikant Shinde यांना उमेदवारी
abp majha web team
Updated at:
01 May 2024 06:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNaresh Mhaske and Shrikant Shinde : ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी
महायुतीकडून ठाणे आणि कल्याणमधील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के आणि कल्याणमधून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्याच्या जागेवरून अनेक दिवस खलबतं सुरू होती. विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी द्यावी, अशी भाजपची इच्छा होती. तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकही इच्छुक असल्याची चर्चा होती. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. त्यामुळे ती जागा सोडण्यास शिंदे गट अजिबात तयार नव्हता असं कळतंय. अखेर दोन्ही जागा शिवसेनेच्या पदरात पडल्या, आणि आज सकाळी उमेदवार जाहीर करण्यात आले.