Thane Mumbai Rain : ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, बस नसल्यान प्रवासी खोळंबले

Continues below advertisement

Thane Mumbai Rain : ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, बस नसल्यान प्रवासी खोळंबले 

मुंबई: मुंबई आणि उपनगर परिसरात गेल्या काही तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या सहा तासांमध्ये मुंबईत 300 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील तीन ते चार तास मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा मुंबईकरांसाठी (Mumbai Rains) सावधगिरीचा इशारा मानला जात आहे. कारण यापूर्वीचा अनुभव पाहता आणखी काही तास पाऊस कोसळत राहिल्यास मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

याशिवाय, मुंबईत सोमवारी दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात 4.40 मीटरच्या लाटा उसळतील. अशावेळी मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास पावसाच्या पाण्याचा निचरा होणार नाही. त्यामुळे रस्त्यांवर आणखी पाणी साचू शकते. त्यामुळे आता मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे मानले जात आहेत. पुढील काही तास पाऊस सुरु राहिल्यास कामावर निघालेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram